• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ईनाडू, रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन

by Yes News Marathi
June 8, 2024
in मुख्य बातमी
0
ईनाडू, रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थानं त्रस्त होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांचं निधन झालं आहे. शनिवारी 8 जून 2024 रोजी पहाटे 4 वाजून 50 वाजता त्यांचं निधन झालं. रामोजी राव यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या रामोजी फिल्मसिटी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.

रामोजी समुहाचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन झालं असून गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. 5 जून रोजी प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासूनच त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर शनिवारी 8 जून 2024 रोजी पहाटे 4 वाजून 50 वाजता निधन झालं आहे.

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांना ‘आयकॉनिक मीडिया बॅरन’ आणि ‘फिल्म मोगल’ असं म्हटलं जायचं. त्यांचं पूर्ण नाव चेरुकुरी रामोजी राव होतं. ते 87 वर्षांचे होते. उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना 5 जून रोजी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

रामोजी राव यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1936 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला होता. रामोजी राव रामोजी ग्रुपचे अध्यक्ष होते. रामोजी ग्रुपच्या पंखाखाली जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ रामोजी फिल्म सिटी, मार्गदर्शी चिटफंड, ईनाडू तेलुगू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, प्रिया फूड्स, डॉल्फिन हॉटेल्स, उषाकिरण मुव्हीज एवढं मोठं साम्राज्य त्यांनी उभारलं. रामोजी ग्रुपचं मुख्यालय हैदराबादेत आहे. रामोजी राव यांचे चिरंजीव सुमन ईटीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.

Previous Post

सोलापूर- पुणे महामार्गावर आकुंभे गावाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाची बाजूने धडक एक तरुण गंभिर जखमी तर दोघे किरकोळ जखमी

Next Post

मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडून कुर्डुवाडी – मिरज सेक्शनचे निरीक्षण

Next Post
मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडून कुर्डुवाडी – मिरज सेक्शनचे निरीक्षण

मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडून कुर्डुवाडी - मिरज सेक्शनचे निरीक्षण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group