जामखेड – राज्यात पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत जामखेड बाजार समितीत भाजपच्या एक हाती वर्चस्वाला रोहित पवार यांनी सुरूंग लावला या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीलाच्या गटाला समसमान जागा मिळाल्या. मात्र आता राम शिंदे यांनी रोहित पवार यांना धक्का देत बाजी मारली आहे.
जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे आणि रोहित पवार गटाला समसमान जागा मिळाल्या होत्या. दोन्ही गटांचे 9 -9 उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे सभापती पदासाठी ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली यात भाजपाने मारली बाजी आहे.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे शरद कारले हे विजयी झाले आहेत. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कैलास वराट यांची वर्णी लागली आहे.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक फार चुरशीची झाली होती, भाजपच्या राम शिंदे यांनी कर्जत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी भाजपमध्ये प्रवेश देत भाजपच्या पॅनलकडून तिकीट दिले होते. राम शिंदे यांच्या या राजकीय खेळीमुळे रोहित पवारांना मोठा धक्का बसला होता.