ओवाळणी म्हणून सर्व भगिनींना दिल्या पर्स
सोलापूर : जगदंबा नगरातील चौडेश्वरी मंदिरात जगदंबा महिला बचत गटातील सुमारे 500 महिला भगिनींनी स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ऍड. सोमनाथ वैद्य यांना राख्या बांधून आमदारकीसाठी आशीर्वाद दिले. दरम्यान, ओवाळणी म्हणून सर्व भगिनींना पर्स देण्यात आली.
चौडेश्वरी मंदिरात जगदंबा महिला बचत गटाच्या वतीने आज रक्षाबंधन सण उत्साहपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या तयारीत असलेले विकासाचा ध्यास घेतलेल्या ऍड. सोमनाथ वैद्य यांना याप्रसंगी येथील सुमारे 500 महिला भगिनींनी राख्या बांधल्या. औक्षण केले. तसेच येणाऱ्या निवडणुकीत आपण आमदार व्हा असा आशीर्वादही दिला. यावेळी बंधू एड. सोमनाथ वैद्य यांनी ओवाळणी म्हणून सर्वांना पर्स दिल्या. तसेच सर्व भगिनींना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
सर्व महिला भगिनींच्या विकासासाठी त्या आत्मनिर्भार व्हाव्यात यासाठी आणि रक्षणार्थ एक बंधू म्हणून मी कटिबद्ध आहे. अडचणीला कधीही हाक द्या मी तत्पर सेवेत हजर राहील, अशी ग्वाही यावेळी एडवोकेट सोमनाथ वैद्य यांनी दिली.
यावेळी रेखा कदम, हेमा टेके, भाग्यश्री देवांग, शांता शिंदे, उज्वला पवार, अर्चना भोसले, सुनिता ठाकूर , कल्पना पवार, सामाजिक कार्यकर्ते दत्ता पवार, राजेश वाकसे आदींसह सुमारे 500 महिला भगिनी उपस्थित होत्या.