सोलापूर – (दि.2) येथील वारकरी सांप्रदायातील जेष्ठ महिला राजूबाई श्रीपती जांभळे यांच आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या.
त्यांची अंत्ययात्रा निराळे वस्ती यश नगर येथील निवासस्थानापासून आज दुपारी 2 वाजता निघेल. बाळे स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पाच मुलं, सुना-नातवंड असा परिवार आहे. गेली अनेक वर्ष अध्यात्मिक कार्याला राजूबाई जांभळे यांनी वाहुन घेतलं होतं. त्यांच्या पुढील पिढीतही हेच संस्कार आहेत. त्यांची अनेक मुलं, नातवंड भजन, किर्तन आणि अध्यात्मिक कार्यक्रमात सक्रीय असतात. महापालिकेजवळचं आनंद रसवंती गृह आणि चहा कट्टा तसेच झेरॉक्स सेंटर गेली अनेक वर्ष त्या आणि त्याची पुढील पिढी चालवित.