नवी दिल्ली : राजीव गांधी हत्या प्रकरणातील सहा दोषींच्या सुटकेचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. नलिनी आणि आर. पी. रविचंद्रन यांच्यासह सहा जणांच्या सुटकेचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. 30 वर्षांहून अधिक काळ हे आरोपी जेलमध्ये आहेत. त्या आधारावरच त्यांची सुटका करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत. राजीव गांधी हत्या प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहरण सुटकेची मागणी करत कोर्टात धाव घेतली होती. नलिनी यांनी 17 जूनला मद्रास हायकोर्टाने दिलेल्या आदेशाला आव्हान दिले.