येस न्युज मराठी नेटवर्क : प्रभाग 26 मधील राघवेंद्र नगर मधील सर्व कामे उदा. ड्रेनेज पाण्याची पाईपलाईन अंतर्गत रस्ते एलईडी लाईट यांची सुविधा करून दिलेली होती परंतु तेथील नागरिकांची एक मागणी होती की शंभर वर्षाखालील महालक्ष्मीचे पुरातन मंदिराचे आवारात फरशी करण, इलेक्ट्रिक बोर, एलईडी स्ट्रीटलाईट, याची असंख्य नागरिक महिलावर्गाची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन 19-20 भांडवली निधीमधून पाठपुरावा करून त्याचे प्रत्यक्ष कामाचा उद्घाटन सोहळा प्रभाग 26 च्या नगरसेविका राजेश्री चव्हाण यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी उपस्थित नागरिक यांनी सांगितले की गेली पंचवीस ते तीस वर्षापासून आम्ही येथे वास्तव्यास आहोत परंतु प्रत्येक नगरसेवक हे फक्त आश्वासनच देत होते परंतु नगरसेविका राजेश्री चव्हाण यांनी पाठपुरावा करून सदर कामे मार्गी लावून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली त्याबद्दल प्रथम त्यांनी नगरसेविका राजश्री चव्हाण व त्यांचे पती अनिल चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी सदर नगरातील मोहन धुमाळ, संजय जाधव, हणमंत मोती बने,धानया स्वामी, भानुदास सूर्यवंशी, वृषाली सोड्डे, मस्के ताई, झोन 5 चे JE बिराजदार ठेकेदार यशवंत पाथरूड आदी उपस्थित होते.