जनकल्याण मल्टिस्टेट सोलापूरला फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी व्दारे १२६ ते २०० कोटी ठेवी या गटामध्ये सर्वोत्कृष्ट संस्था २०२२-२०२३ हा पुरस्कार शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या सहकार गौरव सोहळ्यात भारत सरकारच्या सहकार खात्याचे सचिव आशीष भुतानी यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख, सहकार खात्याचे नाशिकचे विभागीय निबंधक संभाजीराव निकम, महाराष्ट्र को ऑप क्रेडिट फेडरेशनचे चेअरमन काकासाहेब कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सुरेश वाबळे, बुलढाणा अर्बन मल्टिस्टेटचे चेअरमन राधेश्याम चांडक,अहमदनगरचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना संस्थापक चेअरमन राजेंद्र हजारे, व्हाइस चेअरमन संजय जावळे व संचालक लक्ष्मीकांत जाधव उपस्थित होते.