सोलापूर: जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल ला आंतरशालेय नेहरू हॉकी स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले आहे.

सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर महानगरपालिका सोलापूर तसेच सोलापूर हॉकी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय मैदान नेहरूनगर विजापूर रोड या ठिकाणी घेण्यात आलेल्या 17 वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय आंतरशालेय नेहरू हॉकी स्पर्धेत राज मेमोरियल इंग्लिश स्कूल ने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
यशस्वी संघाचे संस्थेचे माननीय डॉक्टर सौ.राधिकाताई चिलका, माननीय डॉक्टर श्री. सूर्यप्रकाश कोठे, माननीय श्री. देवेंद्र दादा कोठे, माननीय श्री. प्रथमेश दादा कोठे, प्राध्यापक विलास बेत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी सुरा व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
सदर संघाला शाळेतील क्रीडा शिक्षक श्री .अतुल सोनके, श्री. आशुतोष जाधव सहाय्यक मार्गदर्शक श्री. आकाश मकाई यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
उपविजेता संघ: आर्यन पाटोळे, सुदर्शन मगरूमखाणे ,वरद दळवी, राज बेलूर, आदर्श व्यवहारे, ओंकार तोरवी, मंगेश कोरे, मो. जैद शेख ,समर्थ कबाडे, ओंकार नरवडे, फैज शेख, केदार ताकभाते, रयान शेख, आरुष चव्हाण, वर्धन सुरवसे ,श्रीपाद साळुंखे.