सोलापूर: जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता चौथी ते सातवी तील विद्यार्थ्यांकरिता आर्म कॅडेट कोर्स महाराष्ट्र यांच्यावतीने उन्हाळी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा , आर्म कॅडेट कोर्स चे कमांडर निलेश कसबे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती, स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे, स्वर्गीय राजेश अण्णा कोठे, स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून व पूजन करून उन्हाळी प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली.

या नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या हस्ते आर्म कॅडेट कोर्स चे कमांडर निलेश कसबे व सहाय्यक प्रशिक्षक ऐश्वर्या नारायणकर, ओम सपार, वैभव बुडबुडे यांचा सत्कार करण्यात आला.

सदर प्रशिक्षण शिबिर मध्ये विद्यार्थ्यांना कमांडो पी. टी., समंत्र सूर्यनमस्कार, स्व संरक्षण, रायफल व पिस्तूल शूटिंग, आर्चरी, लाठी काठी दांडपट्टा तलवारबाजी, रस्सीखेच, या खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन मुलांकडून प्रात्यक्षिक रित्या ते करून घेण्यात आले.तसेच एडवेंचर ऍक्टिव्हिटीज, जीप लाईन, फन गेम्स, आट्या पाट्या, हूला हुप, बलुन पॉप, फन रेस, सारखे सांघिक खेळ घेण्यात आले.

सदर समर कॅम्प बद्द्ल विद्यार्थी व पालक यांनी आपला अभिप्राय दिला. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांनी शाळेत समर कॅम्प घेण्यापाठीमागील हेतू आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

सदर कॅम्प यशस्वी करण्यासाठी डॉक्टर राधिका चिलका, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, देवेंद्र दादा कोठे, प्रथमेश दादा कोठे, विलास बेत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मागदर्शन लाभले.

सदर कॅम्प यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक कादीरहुसेन चोपदार, क्रीडा शिक्षक आशितोष जाधव, अतुल सोनके , व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.