सोलापूर: जूनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये स्व. राजेश अण्णा कोठे यांची 58 वी जयंती साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम पालक शिक्षक संघाचे सदस्य शोभा येळवे, शाळेतील शिक्षक दीपाली गलगली, राखी शुक्ला, सदानंद दिकोंडा, विद्या माने यांच्या हस्ते स्व. विष्णूपंत कोठे, स्व. कौशल्या काकू कोठे, स्व. राजेश अण्णा कोठे, सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. या नंतर सदर जयंती बद्दल विद्यार्थी व शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या दिनाचे औचित्य साधून शाळेत वृक्षारोपण ,नर्सरी, एल. के.जी. आणि यू. के. जी. तिल विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा, तसेच इयत्ता 1ली ते 4थी साठी गोष्ट कथन स्पर्धा, व 5 वी ते 7वी साठी हस्तकला स्पर्धा, आणि इयत्ता 8 वी ते 10वी साठी हस्तक्षार स्पर्धा घेऊन त्याचे बक्षिस वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थाध्यक्ष मा. महेश अण्णा कोठे, डॉक्टर राधिकाताई चिलका,डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, मा. देवेंद्र दादा कोठे, मा. प्रथमेश दादा कोठे, प्रा. विलास बेत , शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमूख मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.