सोलापूर: जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल यांच्यामार्फत व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम प्रमुख पाहुण्या प्रमुख पाहुण्या धनश्री अतुल देशपांडे (साठे) महाराष्ट्र राज्य (श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त ), डॉ.राधिकाताई चिलका , पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्षा शोभा कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा,सुमुख गायकवाड यांच्या हस्ते देवी सरस्वती स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे, स्वर्गीय राजेश अण्णा कोठे, स्वर्गीय महेश अण्णा कोठे, यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून,तसेच प्रमुख पाहुण्या च्या हस्ते बुद्धिबळ पट वरील चाल खेळून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुण्या धनश्री अतुल देशपांडे यांनी व डॉ राधिका ताई चिलका यांनी खेळाडूना मार्गदर्शन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सदर जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत 200 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे .
सदर स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या गटामध्ये प्रथम चार क्रमांकाच्या मुले व मुली ची निवड नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तर 13 वर्षाखालील प्रथम दोन मुले व मुली यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड होणार आहे. ही स्पर्धा 19 वर्ष, 13 वर्ष , व 9 वर्षाखालील खेळाडूंसाठी असणार आहे . एकूण 72 बक्षिसे देण्यात येणार आहेत.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे माननीय डॉक्टर राधिकाताई चिलका, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे , देवेंद्र दादा कोठे, प्रथमेश दादा कोठे, प्राध्यापक विलास बेत शाळेच्या मुख्याध्यापिकारोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.




