सोलापूर: जुनी मिल कंपाऊंड येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल ९९.३५ टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत सन 2022 -23 या शैक्षणिक वर्ष चा दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. सदर निकालामध्ये शाळेतील विद्यार्थी कुमार अथर्व हरिप्रसाद आडकी 94.60% मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, व कुमारी अनुष्का धनंजय सोनवणे हिने 94% गुण मिळवत द्वितीय तर कु. रचना संजय धनवे हिने 93.60% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला ,तसेच कुमारी ज्ञानेश्वरी अनिल शिंदे हिने 93.20% मिळवत चतुर्थ क्रमांक व कुमारी अल्फिया इलाही मोगल हिने 91.60% गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला. शाळेतील सहा विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश संपादन केले, तर प्रथम श्रेणीमध्ये 38 विद्यार्थ्यांनी, तसेच द्वितीय श्रेणीमध्ये 43 विद्यार्थ्यांनी यश संपादन करत शाळेचा 99.35% निकालाची परंपरा कायम राखली आहे.
याप्रसंगी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या हस्ते करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे महेश कोठे, डॉक्टर राधिका ताई चिलका, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे, प्राध्यापक विलास बेत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा व शाळेतील सर्व शिक्षक वृंद व यांनी विशेष अभिनंदन केले आहे.