सातारा (सुधीर गोखले) – गेल्या दोन दिवसापासून राज्यात विविध ठिकाणी मान्सून सक्रिय झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचे माहेरघर असलेल्या सातारा जिल्ह्याच्या डोंगररांगांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरु आहे. साताऱ्याजवळ असलेल्या प्रसिद्ध महाबळेश्वर या पर्यटनस्थळी तर पावसाची जोरदार बॅटिंग जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु झाल्याचे चित्र आहे. महाबळेश्वर पाचगणी या मुख्य रस्त्यावर पावसाने पाणीच पाणी झाले आहे.
दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर या भागामध्ये वाढला असून सातारा महाबळेश्वर पासून पोलादपूर जवळ आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली झाली आहे.
वेण्णा तलाव तुडुंब भरला
महाबळेश्वर हे एक महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण तसेच पावसाचे माहेरघर समजले जाते तर एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ देखील आहे याठिकाणी असलेला वेण्णा तलाव हा देखील पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. महाबळेश्वर आणि पाचगणीच्या नागरिकांची तहान भागवणारा वेण्णा तलाव यंदाच्या पावसाळ्यामध्ये तर आताच तुडुंब भरला आहे.
सध्या महाबळेश्वर पाचगणी या मुख्य रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहनांना वाट काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.