येस न्युज मराठी नेटवर्क : भारतीय रेल्वेकडून आता ट्रेनमध्ये आणखी एक क्लास आणला जाणार आहे. आतापर्यंत रेल्वेच्या एसी कोचमध्ये तीन क्लास होते. आता यात ‘एसी थ्री टियर इकॉनॉमी क्लास’ नावाचा एक क्लास जोडला जाणार आहे. ट्रेनमध्ये या श्रेणीसाठी वेगळ्या धाटणीचे कोच बनवले जात आहेत. रेल्वेच्या कपूरथला स्थित रेल्वे कोच फॅक्ट्रीमध्ये हे कोच तयार केले जात आहेत. थ्री टियर इकॉनॉमी क्लास अथवा थर्ड एसी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवाशांना थर्ड एसीपेक्षा कमी तिकिटदर लागणार आहे.