येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरालगत असलेल्या डोणगाव कवठे रोडवर नव्याने उभारण्यात आलेल्या रचना इंडस्ट्रीचा शुभारंभ दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळे आणि येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते बुधवारी दुपारी करण्यात आला. यावेळी नगरसेवक लक्ष्मण काका जाधव , कवठे गावचे सरपंच सरदार शेख तसेच रचना इंडस्ट्रीजचे मालक याकुब शेख उपस्थित होते. दैनिक सुराज्य चे संपादक राकेश टोळे यांच्या हस्ते या फर्मचे रिबीन कट करून उद्घाटन करण्यात आले तर येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते मशीनची पूजा करून तसेच रिबीन कट करून शुभारंभ करण्यात आला. या इंडस्ट्रीमध्ये बांधकाम व्यवसायिकासाठी लागणारे स्लॅब कव्हर ब्लॉक, सिमेंट विटा ,पेवर ब्लॉक, तसेच काँक्रीट चेंबर कव्हर बनवले जातात. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सहकारी केल्यामुळे ही फर्म उभारल्याचे याकुब शेख म्हणाले.
दैनिक सुराज्यचे संपादक व राकेश टोळे यांनी याकुब शेख यांच्या आजवरच्या जिद्दी वाटचालीचे कौतुक केले. शिवाजी सुरवसे यांनी देखील आपल्या मनोगतामध्ये याकुब शेख यांच्या जिद्दीला सलाम केला. यावेळी नगरसेवक लक्ष्मण काका जाधव यांनी देखील शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास सोमनाथ घुले ,सलीम शेख ,आदम शेख ,अब्दुल शेख, राजेश काळे ,संतोष बंडगर, कन्हैया काळे, रफिक शेख ,आप्पा कोळेकर आदी उपस्थित होते.