सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रशासनाला निवडणूक कार्यक्रम राबविण्यात सपशेल अपयश आले आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये राहत असलेल्या नागरिकांची नावे प्रभाग क्रमांक 26 मध्ये दाखवण्यात आल्याने मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ऑनलाईन मतदान केंद्र वसुंधरा कॉलेज दाखवत असताना प्रत्यक्षात मात्र इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल येथे नावे आलेले आहेत. काही जणांची ऑनलाईन नावे भारतीय विद्यापीठ असे दाखवत असताना त्यांंची नावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शाळेतील मतदान केंद्रावर आलेले आहेत.
त्यामुळे नागरिकांना, विशेषतः महिला व वयस्कर मतदारांना या मतदान केंद्रावरून त्या मतदान केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहे. या सर्व नाहक त्रासामुळे मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत निरुत्साह दिसून येत आहे. परिणामी मतदान अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

