मोहोळ सोलापूर । आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर च्या उद्यम इंक्युबेशन सेंटर- मार्फत सोलापूर स्टार्टअप यात्रा मोहोळ तालुक्यातील बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय ,अनगर येथे दाखल झाली. यावेळी राजन पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांच्या प्रेरणेने बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर या महाविद्यालयाने तालुक्याचे निमंत्रक महाविद्यालय म्हणून काम बजावले.
यावेळी बोलताना संस्थेचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत सूर्यवंशी म्हणाले की विद्यापीठाने महाविद्यालयास निमंत्रक महाविद्यालय होण्याची संधी दिली व त्या संधीचा महाविद्यालय आपल्या तालुक्यातील नवयुवकांना स्टार्टअप च्या माध्यमातून फायदा करून देईल. यावेळी प्रसिद्ध उद्योजक श्री सुनील घाटुळे यांनी नवउद्योजकांना त्यांचे अनुभव सादर करून प्रेरणा दिली.
यावेळी उद्योजक सचिन थिटे आणि विष्णू थिटे यांनी तरुण-तरुणी व नवयुवकांना आपल्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तालुक्यातील युवकांसाठी शक्य तेवढी आणि शक्य ती मदत करण्यास तयार असल्याचे आश्वासन दिले. तसेच प्राध्यापक डॉ. संतोष थिटे यांनी त्यांच्या नावीन्यपूर्ण व्यवसायाची सादरीकरण विद्यार्थ्यांसमोर केले आणि त्यांना त्यांच्या संकल्पना कशा प्रकारे पुढे न्यायचे याचे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इनक्युबेशन सेंटरचे सीईओ आणि विद्यापीठाच्या इनोवेशन इंक्युबेशन अँड लीकेजेस चे डायरेक्टर डॉ. सचिन लड्डा यांनी युवकांना त्यांच्या मार्गदर्शनद्वारे आपल्या नाविन्यपूर्ण शेती पूरक कल्पनेचे नव-उद्योगांमध्ये कसे रूपांतर करावे याचे मार्गदर्शन केले आणि त्यादृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे घेत असलेल्या वेगवेगळ्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांनी ग्रामीण भागातील शेतीपूरक नवं उद्योजक याना आश्र्वासित केले की त्यांना 100 टक्के सहाय्य करू, गरज भक्त त्याचे पूढे यायची आहे.
यावेळी विद्यापीठाच्या उद्यम इनक्युबेशन सेंटरचे मॅनेजर श्रीनिवास पाटील आणि श्रीनिवास नलगेशी उपस्थित होते.
महाविद्यालयातर्फे ही यात्रा यशस्वी होण्यासाठी डॉ. तुकाराम म्हमाने आणि डॉ. सचिन शिरामे यांनी परिश्रम घेतले. ही यात्रा दिनांक 28 नोव्हेंबर 2022 यात्रेचा दहावा दिवस रोजी एस.के. एन. सिंहगड कॉलेज कोर्टी पंढरपूर येथे दाखल होणार आहे