• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, February 26, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामुळे सोलापूरच्या विकासाला चालना: आयुक्त डॉ. ओम्बासे

by Yes News Marathi
February 26, 2026
in इतर घडामोडी
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामुळे सोलापूरच्या विकासाला चालना: आयुक्त डॉ. ओम्बासे
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर विद्यापीठात भाषा व वाङ्मय संकुलाच्या इमारतीचे भूमिपूजन..

सोलापूर – केवळ एका जिल्ह्यासाठी सन २००४ मध्ये सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली आणि जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दर्जेदार सोय उपलब्ध झाली. मुला-मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी मिळाली, तसेच संशोधनाच्या विविध संधीही निर्माण झाल्या. या सर्व प्रक्रियेमुळे सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीत विद्यापीठाचा वाटा निश्चितच महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.

गुरुवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ४८२ एकर परिसरात पीएम-उषा योजनेअंतर्गत मंजूर निधीतून उभारण्यात येणाऱ्या भाषा व वाङ्मय संकुल इमारतीचे भूमिपूजन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आणि पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार भोसले, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, अभियंता गिरीश कुलकर्णी, प्रल्हाद कांबळे, अधिसभा सदस्य ॲड. मल्लिनाथ शहाबादे, डॉ. वीरभद्र दंडे, डॉ. जैनुद्दीन मुल्ला, डॉ. नेताजी कोकाटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पीएम उषा विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले.

आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी भाषा व वाङ्मय संकुलाच्या नवीन इमारतीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून अभ्यास, संशोधन आणि साहित्यिक उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आज भाषा व वाङ्मय संकुलाची उभारणी होत आहे, ही विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब आहे. या इमारतीमुळे भाषा विषयाच्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. येथून शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी वैयक्तिक प्रगती साधत असताना सोलापूरच्या विकासातही आपला सक्रिय वाटा उचलावा, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. महानवर यांनी विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग यांचे सहकार्य लाभत असल्याचे नमूद केले. सर्व संबंधित यंत्रणांच्या पाठबळामुळे विद्यापीठ प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे सांगून त्यांनी सर्वांचे आभार मानले. पीएम-उषा योजनेतून साकार होणारे भाषा व वाङ्मय संकुल हे विद्यापीठाच्या शैक्षणिक पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर ठरणार असून, विद्यार्थ्यांसाठी आधुनिक व सुसज्ज शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Previous Post

पद्मशाली समाजाच्या लोकप्रतिनिधींचा शनिवारी सत्कार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In