पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नेहरू युवा केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जय भीम पदयात्रेचे आयोजन मा. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

या पदयात्रेचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर पद यात्रेच्या वेळी विद्यापीठाचे प्र.कुलसचिव डॉ. अतुल लकडे , विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे , नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी श्री. अजितकुमार , विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, श्री राजाभाऊ सरवदे, कॉमर्स विभागाचे डिन डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. तानाजी कोळेकर, सहाय्यक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.



जय भीम पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरू होवून नवी वेस पोलीस चौकी, सरस्वती चौक, चार पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात समारोप करण्यात आला. सदर पद यात्रेत सोलापूर शहरातील 19 महाविद्यालयातील 250 विद्यार्थी स्वयंसेवक स्वयंसेविका व कार्यक्रम अधिकारी व विद्यापीठातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.