सोलापूर, दि. 10- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत बहिस्थ विभागातील बीए आणि बीकॉम तृतीय वर्ष अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.
केवळ बीए आणि बीकॉमच्या तृतीय वर्ष अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून त्यासंदर्भातील प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या बहिस्थ केंद्राच्या महाविद्यालयात जमा करण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. विलंब शुल्कासह 28 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. su.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांनी अर्ज भरावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणिक शहा यांनी केले आहे.