सोलापूर : मिशन कवच-कुंडल अंतर्गत सिटी टास्कफोर्सची बैठक आज आयुक्त कार्यालयात घेण्यात आली.या बैठकीत ज्या नागरिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण कमी झालेल्या आहेत त्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या मांजरेवाडी नागरी आरोग्य केंद्र 91टक्के, देगाव नागरी आरोग्य केंद्र 84 टक्के, भावना ऋषी नागरी आरोग्य केंद्र 80 टक्के इतके लसीकरण झालेले आहेत तसेच नई जिंदगी नागरिक आरोग्य केंद्र येथे फक्त 25% दाराशा नागरी आरोग्य केंद्र 30 टक्के, सिविल हॉस्पिटल परिसर मध्ये 35 टक्के, जिजामाता नागरिक आरोग्य केंद्र 40 टक्के लसीकरण झाले असून या सगळ्या नागरिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण कमी प्रमाणात झाल्यामुळे त्या भागातील नागरिक हे लसीकरण केंद्रावरती लस घेण्यासाठी येत नाही. त्यामुळे या नागरिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत अजून लसीकरण केंद्र वाढवण्यात येणार आहे.
त्यासाठी इंडियन रेड क्रॉस तसेच रोटरी क्लब च्या सहाय्याने 14 ऑक्टोबर पासून मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक ठिकाणी जाऊन मोफत लस देण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी कमी लसीकरण झालेले आहे. त्या भागातील लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी तसेच नागरिकांनी आपल्या नागरिक आरोग्य केंद्रावरती जाऊन प्रथम डोस घ्यावे असे आवाहन आयुक्त पि.शिवशंकर यांनी केले आहे. तसेच ज्या भागांमध्ये लसीकरण कमी झालेले आहे. त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून दुकान,इतर व्यवसाय करत असलेल्या व्यक्तीचा लसीकरण झालेला आहे का नाही याची तपासणी करण्यात येणार आहे.लसीकरण झाले नसेल तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शहरातील शंभर टक्के लसीकरण व्हावे त्यासाठी महापालिका प्रत्यन करत आहे. तरी सर्व नागरिकांनी तसेच सर्व संघटना, संस्था व लोकप्रतिनिधी तसेच नगरसेवक यांनी त्यांच्या भागामध्ये लसीकरणासाठी प्रबोधन करून त्यांचे लसीकरण करून घ्यावे व महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त पि. शिवशंकर यांनी केले.