आज दि. 14.01.2023 रोजी सोलापूर वन विभाग अंतर्गत वनपरिक्षेत्र मोहोळ मधील मौजे चिखली येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 65 रोड लगत गवा हा वन्यप्राणी मृतअवस्थेत आढळून – आलेला आहे. सदर वन्यप्राण्यास ताब्यात घेऊन घटनास्थळ पंचनामा करून वनगुन्हा नोंद करणेत आलेला आहे.
- सदर गवा या वन्यप्राण्याचे वय अंदाजे 4 ते 5 वर्षे आहे. सदर वन्यप्राण्यास मौजे हिवरे येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात आणुन सतीश उटगे, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहोळ, सागर जवळगी अतिरीक्त वनपरिमंडळ अधिकारी, सुरेश कुर्ले वनरक्षक मोडनिंब व वनकर्मचारी यांचे समक्ष रनवरे पशुवैदयकीय अधिकारी, मोहोळ यांनी मृत गवा या वन्यप्राण्याचे शवविच्छेदन करण्यात आलेले असून शवविच्छेदन अहवालामध्ये सदर गवा या वन्यप्राण्याचा मृत्यू हा अज्ञात वाहनाच्या धडकेने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- सदर प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरूध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2(16),9,29 R/W 57, 50 व 51 अन्वये प्रथमिक वनगुन्हा क्रमांक WLP – 01/ दिनांक 14.01.2023 अन्वये अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
- गेली २ वर्षात महामार्गांवर भरधाव वेगामुळे धडक लागून मृत्युमुखी पडणाऱ्या वन्यजीवांची संख्या वाढतच आहे, यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असून ही चिंतेची बाब असल्याने यावर सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आणि वनविभागाने एकत्रित येऊन एक सकारात्मक मार्ग काढणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले
- सदर प्रकरणी वनगुन्ह्याचा पुढील तपास धैर्यशिल पाटील उपवनसंरक्षक, सोलापूर वन विभाग सोलापूर व एल. ए. आवारे सहाय्यक वनसंरक्षक रोहयो सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सतिश उटगे, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहोळ हे करित असल्याचे सोलापूर वनविभागाकडून कळविण्यात आले आहे.