सोलापूर : नैसर्गिक आपत्ती असो की मानव निर्मित आपत्ती असो त्याला सामोरं कसं जायचं आपली सिद्धता कशी असावी, प्रशासनाची,पोलिसांची यंत्रणा कशी काम करते, आपली जबाबदारी आणि कर्तव्ये काय आहेत आणि आपत्ती मध्ये आपण संकट मोचक कसे व्हावे याची सविस्तर माहिती असलेला यंदाचा दैनिक सांज चा दिवाळी अंक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित झाला त्यानंतर कार्यकारी संपादक अविनाश कुलकर्णी यांनी त्यांना दिवाळी अंक भेट दिला यावेळी सर्वमित्र सुरेश फलमारी उपस्थित होते. प्रत्येकाच्या संग्रही असावा असा सांज चा संकटमोचक दिवाळी अंक असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले.