सोलापूर : भारत रत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव (सोलापूर) येथील प्राचार्य, डॉ. अनिल के. देशमाने यांचे “आर्टिफिशियल इंटेलिजन्स & मशीन लर्निंगः बिल्डिंग द फ्युचर” हे नववे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण योगदान मानले जात आहे.
प्रा. डॉ. देशमाने यांना शैक्षणिक क्षेत्रात 32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यात त्यानी 20 वर्षे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. तसेच, दोन वर्षे ते तुळजाभवानी इंजिनिअरिंग कॉलेज, तुळजापूर येथे मान्यताप्राप्त प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बार्शी येथे 10 वर्षांचा प्राचार्य म्हणून अनुभव आहे.
सध्या, ते भारत रत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर येथे प्राचार्य/ संचालक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर यांचे Ph.D चे मार्गदर्शक म्हणून देखील काम करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थ्यांनी Ph.D केली आहे. त्यांनी DBATU Lonere विद्यापीठामध्ये अभ्यास मंडळावर पण काम केले आहे.
प्रा. डॉ. अनिल के. देशमाने यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या नवीन पुस्तकामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल सखोल माहिती दिली आहे.
हे पुस्तक विद्यार्थ्यांना, शास्त्रज्ञांना आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांना नवीन तंत्रज्ञानाच्या दिशेने मार्गदर्शन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या या कार्यास संस्थेचे अध्यक्ष मा. रविंदजी गायकवाड व संस्थेचे सचिव मा. अनामिका गायकवाड मॅडम व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सरांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
प्रा. डॉ. अनिल के. देशमाने यांच्या या योगदानामुळे शैक्षणिक व तंत्रज्ञान क्षेत्रात एक नवा ठसा पडेल, हे निश्चित आहे.