सोलापूर, दि.2- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ‘2025 दैनंदिनी’ डायरीचे प्रकाशन कुलगुरु प्रा. डाॅ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आले.
कुलगुरू कार्यालयात पार पडलेल्या दैनंदिनी डायरी प्रकाशनाच्यावेळी प्र-कुलगुरु प्रा. डाॅ. लक्ष्मीकांत दामा, दैंनदिनी समितीचे अध्यक्ष डाॅ. गौतम कांबळे, डाॅ. अर्चना लावंड, डाॅ. राजीवकुमार मेंते , प्रा. चंद्रकांत गार्डी, अधिसभा सदस्य प्रा. वीरभद्र दंडे तसेच दैनंदिन समितीचे सदस्य सचिव, सहायक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे आदी उपस्थित होते.
या दैनंदिनी डायरीमध्ये विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांची माहिती, उच्च शिक्षण विभागाची माहिती, विद्यापीठ गीत, महाराष्ट्र गीत, संविधान उद्देशिका, शासकीय सुट्ट्या व इतर महत्वपूर्ण माहितीने दैनंदिनी परिपूर्ण करण्यात आली आहे.