येस न्युज मराठी नेटवर्क : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शर्जील उस्मानीविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शरजील उस्मानी याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत उस्मानी याने प्रक्षोक्षक भाषण करून भावना दुखावल्याप्रकरणी गावडे यांनी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. उस्मानीविरोधात भादंवि १५३ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.