येस न्युज नेटवर्क : भाजपाचे आमदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू केंद्र सरकारचा निषेध म्हणून त्यांचे पदक गंगेत विसर्जित करणार आहेत. पदक गंगेत विसर्जित केल्यावर इंडिया गेटवर उपोषण करणार आहेत.
पैलवान विनेश फोगाटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. मंगळवारी सर्व आंदोलक पैलवान आपले मेडल संध्यकाळी सहा वाजता हरिद्वार येथे गंगा नदीत विसर्जित करणार आहेत. दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारावाईनंतर दोन दिवसांनी विनेश फोगाटने हा निर्णय घेतला आहे. विनेश फोगाटने ट्विटरवर एक पत्र शेअर केले आहे. या पत्रात विनेशने म्हटले आहे की, 28 मे रोजी आमच्यासोबत झालेला प्रकार सर्वांना पाहिला. त्यानंतर या देशात आमच्यासाठी काहीच राहिले नााही. आजही आम्हाला तो क्षण आठवतो ज्या दिवशी आम्ही देशासाठी ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियशनशिप पदक देशासाठी कमावले. परंतु दोन दिवसापूर्वी झालेल्या प्रकारानंतर आता आम्हाला वाटते, आम्ही हे पदक का कमावले होते?