येस न्युज मराठी नेटवर्क : दिल्ली पोलिसांनी संयुक्त किसान मोर्चामधील आंदोलकांनी दिल्लीमध्ये घुसू नये म्हणून ही नाकाबंदी केलीय. या भिंतीच्या पलीकडेही दीड किलोमीटरपर्यंत वेगवेगळे अडथळे उभारत बॅरिकेट्, खिळे, लोखंडी खांब, तारा टाकून प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र यामुळे आता शेतकऱ्यांना दिल्ली सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या शौचालय व्हॅन आणि पाण्याच्या टँकर्सपर्यंतही पोहचता येत नाहीय. त्यामुळेच दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर पाणी आणि शौचालयांसारख्या मूलभूत गरजांपासूनही वंचित असल्याचे चित्र दिसत आहे.