सोलापूर :- आम आदमी पार्टी सोलापूर तर्फे गॅस दर वाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. आपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद पूनम गेट समोर चूल पेटवून भाकऱ्या बनविल्या आणि वीज दर वाढी विरोधातला आक्रोश व्यक्त केला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटक सागर पाटील यांनी गँस सबसिडी मध्ये सरकार भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केला. तर युवा अध्यक्ष निलेश संगेपाग यांनी सरकार महागाई वाढवून मित्रांना अमीर बनवत असल्याचे आरोप केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटक सागर पाटील, उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, युवा अध्यक्ष निलेश संगेपाग, शहर मध्य अध्यक्ष जुबेर हिरापुरे, संघटक आनंद जाधव, महिला संघटक अश्विनी गायकवाड, प्रसाद बाबानगरे, रहीम शेख, मेहमूद गब्बूरे, मल्लिकार्जुन पिलगेरी, नितीन गायकवाड, जैनोद्दीन शेख, गौतम सोनटक्के, मदणी चाचा, सरोजा पिलगेरी, भारती उपळेकर, तेजश्री क्षीरसागर, आदी उपस्थित होते.