भोसे (क.) : महात्मा ज्योतीराव फुले इतिहास अकादमी, पुणे, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दिला जाणारा महात्मा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. महादेव तळेकर यांना जाहीर केला आहे.
प्रा. महादेव तळेकर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय तळेकर यांनी कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे संस्थेने कळविले आहे. पुरस्कार वितरण सोहळा २३ जानेवारी रोजी पुणे येथील एस. एम. जोशी सभागृह येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे.