येस न्युज मराठी नेटवर्क । सोलापूर महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिक व सार्वजनिक गणेश मंडळाना आवाहन करण्यात आले होते. सर्वत्र कोव्हीड-१९ या संसर्गजन्य विषाणूमुळे कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात गणेश मुर्ती विसर्जन या दरम्यान नागरिकांची गर्दी होऊ नये व सोशल डिस्टनसिंग पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच कोविड-१९ मुळे संसर्गजन्य उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता गणेशमूर्ती विसर्जन घरगुती साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.
त्या अनुषंगाने राज्यस्तरीय तसेच स्थानिक वृत्तपत्रे यांचे मार्फत नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक तसेच घरगुती पद्धतीने गणेशमूर्ती विसर्जन करणेकरिता जनजागृती होणे कामी सोलापूर महानगरपालिकेकडून “घरगुती गणेशमूर्ती विसर्जन सेल्फी विसर्जन वृत्तपत्र प्रकाशन स्पर्धा” चे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये नागरिकांनी आपले गणेशमूर्तीचे घरगुती विसर्जन करतेवेळी गणेशमूर्ती समवेत Selfie घ्यावयाचा असून सदर फोटो हे राज्यस्तरीय तसेच स्थानिक वृत्तपत्रांनी आपले वृत्तपत्रामधून प्रकाशित करावयाचे होते.त्यानुसार सोलापूर शहरातील दैनिक दिव्य मराठी यांना राज्यस्तरीय वृत्तपत्रातून पहिले बक्षीस 3 लाख रुपये तर स्थानिक वृत्तपत्रातून दैनिक सुराज्य यांना पाहिले बक्षीस 3 लाख रुपये व सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र दैनिक दिव्य मराठीचे वृत्तसंपादक श्रीकांत कांबळे व दैनिक सुराज्यचे वृत्तसंपादक राजकुमार नरोटे यांनी महापौर श्रीकांचना यन्नम व महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांच्या हस्ते स्वीकारले.याप्रसंगी उपायुक्त धनराज पांडे,पत्रकार चंद्रकांत मिरखोर,इसुफ शेख,पत्रकार दीपक शेळके, नगरसचिव प्रवीण दंतकाळे, विजयकुमार कांबळे, तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.