येस न्युज मराठी नेटवर्क : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या भवितव्याचा फैसला आज ठरणार आहे. क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, गेल्या 17 दिवसांपासून आर्यन खान क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर आज सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस कोर्टानं गेल्या सुनावणीत जामीन अर्जावरील निर्णय सुरक्षित ठेवला होता.
एनसीबीनं 14 ऑक्टोबर रोजी विशेष एनडीपीए कोर्टाक बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जाला विरोध करत दावा केला आहे की, आर्यन मादक पदार्थांचं सेवन करतो. मुंबईतील क्रूझ ड्रग प्रकरणी आर्यन खान गेल्या 17 दिवसांपासून अटकेत आहे. तसेच त्याच्याकडून कारवाई दरम्यान, ड्रग्सही जप्त करण्यात आले होते.