सोलापूर, दि. 22 एप्रिल-
महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येईल, असे अश्वासन उच्च शिक्षण विभाग सोलापूरचे सहसंचालक डॉ. उमेश काकडे यांनी दिले.
डॉ. काकडे यांनी सोलापूर विभागाचा पदभार सोमवारी घेतला. यावेळी सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनच्या वतीने त्यांची भेट घेण्यात आल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिले. यावेळी युनियनच्या वतीने त्यांचे स्वागत युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले यांनी केले.
यावेळी युनियनचे सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, खजिनदार राहूल कराडे, उपाध्यक्ष आनंद व्हटकर, विद्यापीठ सिनेट सदस्य अजितकुमार संगवे, वालचंद समाजकार्य विभागाचे अधिक्षक अमोल सुपाते, लेखापाल वैभव सुपेकर आदी उपस्थित होते.