पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. मोदींनी केवाडियामधील वेगवेगळया प्रकल्पांचे उद्घाटन केले.
केवडियामध्ये पक्षीप्रेमींना निश्चित आनंद मिळेल. या पक्षीगृहाला नक्की भेट द्या, असे मोदींनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
केवडियामध्ये तुम्ही जंगल सफारी करु शकता. भारतातील प्राण्यांमधील विविधता तुम्हाला इथे अनुभवता येईल. मला संध्याकाळी जंगल सफारीची संधी मिळाली असे मोदींनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.