येस न्युज मराठी नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या या संवादादरम्यान मोदींना भावना अनावर झाल्या. कोरोनाने झालेल्या मृत्यूंमुळे मोदी भावूक झाले. कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावलं, असं मोदी म्हणाले. डॉक्टरांसोबत बोलताना मोदींचा हुंदका दाटला.
यावेळी मोदी म्हणाले, “मी काशीचा सेवक या नात्याने सर्व काशीवासियांचे आभार मानतो. विशेष करुन आमचे डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांनी जे काम केलंय, ते अतुलनीय आहे. या व्हायरसने आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्यापासून हिरावलं. मी त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करतो”