नवी दिल्ली, : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका 10 वर्षांच्या चिमुरडीचा बालहट्ट पुरवला आहे. या चिमुकल्यानं पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि पंतप्रधानांनी वेळात वेळ काढून या मुलीचा बालहट्ट पुरवला आहे.
ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची मुलगी आहे.सुजय विखे पाटील यांची 10 वर्षांची मुलगी अनिशान पंतप्रधान नरेंद्र मोदींना ईमेल पाठवून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ रिप्लायच नाही तर तिची भेटही घेतली आहे. मोदींनी केलेल्या रिप्लायची ही आता चर्चा झाली आहे.भाजपच्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, 10 वर्षांच्या मुलीने ईमेल करत पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि पंतप्रधानांनी तिची इच्छा पूर्ण केली.