सोलापूर : माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी तथा प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांचे प्रमोशन झाले असून त्यांची बदली लातूर शिक्षणाधिकारी योजना या पदावर करण्यात आली आहे. तसेच माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांचेही प्रमोशन झाले असून त्यांना रायगड शिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. सोलापूरच्या प्राथमिक शिक्षण विभागाला अद्यापही पूर्ण वेळ शिक्षणाधिकारी देण्यात आला नाही.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने उपशिक्षणाधिकारी पदातून शिक्षणाधिकारी पदावर नियुक्त दिल्या आहेत. त्यामध्ये सोलापूरच्या प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे आणि माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांचा समावेश आहे.
जुलै महिन्यामध्ये तृप्ती अंधारे या सोलापूरला माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी पदावर आल्या त्या येताच त्यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला. त्यानंतर परत दोन वेळा त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार सांभाळला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याचा प्रभारी देण्यात आला होता. त्यांनी सोलापुरातील आठ महिन्याच्या कार्यकाळात सर्वाधिक काळ हा शिक्षणाधिकारी पदावर घालवला आहे. त्यामुळे त्या सोलापुरात लकी ठरल्या. महारुद्र नाळे यांच्याकडेही काही दिवस शिक्षणाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला होता..