सचिव डॉ.अभिजीत पुजारी तर कोषाध्यक्षपदी डॉ. प्रवीण ननवरे यांची नियुक्ती
सोलापूर – निमा भवन सोलापूर येथे दिनांक 13 ऑक्टोबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निमा सोलापूरच्या अध्यक्षपदी डॉ.नागनाथ जिड्डीमनी यांची तर सचिवपदी डॉ. अभिजीत पुजारी व कोषाध्यक्षपदी डॉ. प्रवीण ननवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष डॉक्टर रविराज गायकवाड, सचिव डॉक्टर सचिन बोंगरगे यांच्याकडून नूतन पदाधिकाऱ्यांनी सूत्रे स्वीकारली.
यावेळी निमा सोलापूरच्या वूमन फोरमच्या पदाधिकाऱ्यांची ही निवड करण्यात आली वुमेन्स फोरम अध्यक्षपदी डाॅ.शितल कुलकर्णी सचिवपदी डाॅ.पल्लवी भांगे तर कोषाध्यक्ष म्हणून डाॅ.अश्विनी देगांवकर यांची निवड करण्यात आली. मावळत्या अध्यक्ष्या डॉ. सारिका होमकर, सचिवा डॉ. अपर्णा इंगळे , कोषाध्यक्ष डॉक्टर वैशाली आगवणे यांनी त्यांचेकडे पदभार सोपविला.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात काम करणाऱ्या निमा स्टुडंट फोरमच्या अध्यक्षपदी डाॅ. समर्थ वाले सचिवपदी डाॅ.रोहन चौगुले तरकोषाध्यक्ष पदी डाॅ.अक्षय स्वामी यांची सर्वानुमते निवड झाली.
निमा सोलापूरचे मावळते अध्यक्ष डॉक्टर रविराज गायकवाड यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. निमाचे माजी केंद्रिय अध्यक्ष डाॅ.विनायक टेंम्बुंर्णीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड समिती प्रमुख प्राचार्य डाॅ.प्राचार्य साहेबराव गायकवाड यांनी पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली.
या वेळी निमा सोलापूरची कार्यकारणी देखील ठरवण्यात आली.
यात उपाध्यक्ष . डाॅ.सचिन बोंगरगे, डाॅ.सुर्यकांत धप्पाधुळे,डाॅ.असिफ शेख
उपसचिव-डाॅ.किरण देशमुख, डाॅ.सुनिल कट्टे,
उपकोषाध्यक्ष – डाॅ.आनंद गुंडु, डाॅ.भिमा सिंदगी
आँरगनाईझर – डाॅ.सिद्राम बगले
को-आँरडिनेटर- डाॅ.समीर माशाळकर
प्रेस,पब्लीसिटी प्रमुख – डाॅ.ऊत्कर्ष वैद्य यांची निवड करण्यात आली.
निमा वुमेन्स फोरमच्या कार्यकारिणीमध्ये
सहसचिव – डॉ. ललिता पेठकर
सह कोषाध्यक्ष-डॉ. श्रुती मराठे
तर एक्झिक्युटिव्ह मेंबर्स म्हणून
डॉ. शुभदा देशपांडे
डॉ. आनंदी गायकवाड
डॉ. तबस्सुम शेख यांची निवड करण्यात आली.
निमाच्या जडणघडणीमध्ये मोलाचे सहकार्य देणारे ज्येष्ठ सदस्य डाॅ.अनिल पत्की यांचा "निमा आधारवड" पुरस्कार" देवुन गौरव करण्यात आला .
दुसरी राष्ट्रीय वुमेन ची सभा कल्याण येथे झाली.त्यात महाराष्ट्र वुमेन ला बेस्ट ब्रँन्च अँवार्ड मिळाले. त्याबद्दल महाराष्ट्र वुमेनच्या अध्यक्षा डाॅ.अनुश्री मुंडेवाडी यांचाही गौरव करण्यात आला.
मुंबई येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये निमा सोलापूरच्या माझी महिला अध्यक्ष डाॅ.सारिका होमकर यांना “ब्रेन अँण्ड ब्युटी” किताब मिळाल्याबद्दल निमा सोलापूरच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला.
निमा सोलापूर चे मावळते अध्यक्ष डॉक्टर रविराज गायकवाड त्यांनी उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेस निमा चे केंद्रीय राज्यस्तरावरील पदाधिकारी तसेच सोलापुरातील निमा बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.