सोलापूर – म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीच्यावतीने महिला दिनानिमित्त शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना ‘वंडर वुमन 2023 पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये गायनेकॉलॉजिस्ट डॉ. मीनल चिडगुपकर, आयुर्वेदाचार्य डॉ. नयना व्यवहारे, होमिओपॅथीक डॉ. कीर्ती गोलवलकर, चित्रकार मीनाक्षी रामपुरे, फॅशन डिझायनर सौ. सपना हैदराबादवाले रांभिया, ब्युटीशियन सौ. भारती म्हमाणे, समाजसेविका सौ. प्रीती राठी, उद्योजिका पल्लवी विक्रम बंडेवार, होम बेकर सोनम बंकापूर, सनशाईन वेंचर मॅनेजिंग डायरेक्टर संजीवनी गायकवाड इत्यादी महिलांचा समावेश आहे.
या महिलांचा म्युझिक आर्ट डान्स अकॅडमी च्या वतीने सौ.अमृता काडादी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अध्यक्ष आसावरी गांधी यांच्या हस्ते मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे विविध क्षेत्रात मुलींना कार्य करण्यास संधी मिळू शकते व या सर्व मुलाखती युट्युब वर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, असे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीच्या विकास गोसावी यांनी केले, सूत्रसंचालन भूमीशा शहा यांनी केले. तर आभार सोनाली वाघमोडे यांनी मानले. यावेळेस म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीचे सदस्य व पुरस्कारप्राप्त महिलांचे कुटुंबीय उपस्थित होते.