प्रिसिजन सीएसआर निधीतून आधार विश्वस्थ संस्था येथे सोलर प्रकल्पाचे उद्धाटन
सोलापूर – प्रिसिजन कॅमशॉफ्टस् लिमिटेड कपंनीच्या सीएसआर निधीतून भोगाव ता उत्तर सोलापूर येथील आधार विश्वस्थ संस्थेला देण्यात आलेल्या सोलर प्रकल्पाचे उद्धघाटन आज करण्यात आले. दक्षिण सोलापूरचे आ सुभाष देशमुख, डॉ सुहासिनी शहा, द्वारकाधीश भराडिया, डॉ नंदा शिवगुंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. उद्धाटन प्रसंगी डॉ सुहासिनी शहा यांनी प्रिसिजनच्या माध्यमातून चालणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती दिली. समाजाचे आम्ही काहीतरी देणं लागतो या भावनेतून प्रिसिजन काम करीत आहे असे त्यांनी सांगितले.

याच कार्यक्रमात भराडिया सारीज यांच्याकडून CCTV सिस्टीम या संस्थेस देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले कि प्रिसिजन अनेक वर्षांपासून सीएसआर निधीतून सामाजिक कार्य करीत आहे. सीएसआर निधीतून जेवढे सामाजिक कार्य करता येईल तेवढेच न करता प्रिसिजनने संपूर्ण सोलापूरसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचे नेतृत्व करावे, दातृत्व असणाऱ्यांची संख्या वाढवावी व सोलापूरच्या सामाजिक विकासासाठी काम उभे करावे. सामाजिक नेतृत्वाच्या माध्यमातून सोलापूरची सामाजिक संस्थाची व सामाजिक गरजांची जोड घालून द्यावी असे प्रतिपादन आ देशमुख यांनी केले.

“आधार विश्वस्थ संस्थेच्या वृद्धाश्रमात ९० निराधार आजी आजोबा वास्तवयास आहेत. या संस्थेमध्ये आधार केअर सेंटर, पॅरालिसिस रुग्णांचे फिजिओथेरपी आणि पुनर्वसनसाठी रिहॅब सेंटर, मनोरुग्ण निराधारांच्या पुनर्वसनसाठी आधार घर व निराधार आजी आजोबांसाठी आनंदी गृह वृद्धाश्रम हे प्रकल्प राबविले जातात. प्रिसिजन कंपनी नेहमीच अशा संस्थांना सीएसआर च्या माध्यमातून विविध प्रकारे मदत करत आली आहे. सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून प्रिसिजनने या संस्थेत १५ लाख रुपये किंमतीचा २० केव्हीचा सौरप्रकल्प देण्यात आला. येणाऱ्या काळात या संस्थेचे वीजबिल शून्य रु होण्यासाठी नक्कीच मदत होईल .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे विस्वस्त सतीश मालू यांनी केले तर सूत्रसंचालन प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी संदीप पिसके यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थचे सचिव डॉ प्रतीक शिवगुंडे, जायनारायण भुतडा व संचालिका सौ शिवगुंडे यांनी परिश्रम घेतले.