सोलापूर | प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या ६, ७ आणि ८ नोव्हेंबर २०२० रोजी ‘प्रिसिजन गप्पा’ आयोजिण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाचे यंदा १२ वे पर्व असून सोलापूरकरांना गप्पांची दिवाळी यंदा प्रिसिजन फाउंडेशनच्या फेसबुक पेजवरून ऑनलाईन अनुभवता येणार आहे. आज शुक्रवार दि. ६ नोव्हेंबर रोजी ‘सुमन सुगंध’ ही सांगितिक मैफिल अनुभवायला मिळेल. आपल्या गोड गळ्याने श्रोत्यांच्या ह्दयात अढळपद मिळविणार्या ख्यातनाम पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांची प्रकट मुलाखत हे यंदाच्या प्रिसिजन गप्पांचं वैशिष्ट्य असेल सुमनताईंनी अजरामर केलेल्या गाण्यांचा आनंद घेता येईल. माधुरी करमरकर, विद्या करलगीकर, मंदार आपटे हे कलावंत सुमनताईंची गाणी सादर करतील.