औरंगजेबाचे पोस्टर झळकवून स्टेटस ठेवल्यावरून काही दिवसांपुर्वी राज्यातील वातावरण पेटले होते. (Prakash Ambedkar Visit Aurangjeb Tomb) कोल्हापूरात दंगल भडकली होती, सत्ताधारी आणि विरोधकांनी देखील या प्रकारावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. असे असतांना आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आज अचानक खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली.
औरंगजेबाचे पोस्टर आणि स्टेटस ठेवल्याचा प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी या मुद्यावरून मुस्लिमांनी बॅकफूटवर जावू नये, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर आज थेट औरंगजेबाच्या कबरीला आंबेडकर यांनी भेट दिल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Vanchit Bahujan Aghadi) अचनाक राज्यात औरंगजेबाच्या औलादी कुठून आल्या
, अशी शंका उपस्थितीत करत राज्याचे गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीसह इतर विरोधी पक्षांकडे उंगलीनिर्देश केला होता.
नगर, कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे पोस्टर झळकल्यानंतर राज्याच्या अनेक भागात औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला. कोल्हापूरात दंगल होवून हे शहर दोन दिवस धुमसत होते. राज्यात औरंगजेबाचे उद्दातीकरण कदापी खपवून घेतले जाणार नाही, अ शी भूमिका घेत राज्य सरकारने पोस्टर झळकावणाऱ्या आणि स्टेटस ठेवणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करत कठोर कारवाईची भूमिका घेतली होती.
दरम्यान, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या मुद्यावरून मुस्लिमांनी बॅकफुटवर जाण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले होते. औरंगजेब कसा राजा होता ? याबद्दल देखील त्यांनी आपली मते जाहीरपणे मांडली होती. त्यानंतर आता थेट औरंगजेबाच्या कबरीला भेट देत प्रकाश आंबेडकरांनी सगळ्याच राजकीय पक्षांना धक्का दिला आहे. प्रकाश आंबेडकर हे दोन दिवसांपासून शहरातच असल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे. खाजगी कामानिमित्त ते शहरात असतांना आज दुपारी त्यांनी खुल्ताबाद येथे जावून औरंगजेबाच्या कबरीला भेट दिला.