मराठी सिनेसृष्टीतील प्राजक्ताने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचं नाव घेतलं जातं. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. प्राजक्ताच्या अभिनयासोबतच तिची ग्लॅमरस फॅशन स्टाईल देखील सर्वांना खूप आवडते.

इंस्टाग्रामवर 2 दशलक्ष सब्सक्राइबर्सच्या निमित्ताने प्राजक्ताने तिचा काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.हे फोटो अपलोड होताच पुन्हा एकदा इंटरनेटवर प्राजक्ताच्या लुकची चर्चा पाहायला मिळत आहे. प्राजक्ताचा हा ग्लॅमरस लुक सर्वांना खूप आवडत आहे.या फोटोमध्ये प्राजक्ता मॉर्डन लुकमध्ये पाहायला मिळत आहे.

यावेळी प्राजक्ताने एका बाजूला ऑफ शोल्डर क्रॉप टॉपसह ब्लॅक फ्लोरल प्रिंटेड स्कर्ट घातला आहे. त्याचप्रमाणे या रंगीबेरंगी स्कर्ट मध्ये ती खूपच सुंदर वाटत होती. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी तिच्या सुंदर लुकने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. प्राजक्ताचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

‘रानबाजार’ वेब सीरिजमधून प्राजक्ता तिच्या भूमिकेमुळे चर्चेत होती. प्राजक्ता त्याच्या ग्लॅमरस आदांनी सर्वांना घायळ करते. नुकतेच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो टाकले आहेत. या फोटोमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.