अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत प्रभू श्री राम यांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड उर्फ जितुद्दीन याच्या विरोधात युवा सेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने निषेध नोंदवला व गुन्हा दाखल करावा यासाठी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले. यावेळी बोलत असताना युवा सेना कार्यकारणी सदस्य सुजीत खुर्द म्हणाले की जितेंद्र आव्हाड हा विकृत बुद्धीचा माणूस आहे असे वक्तव्य करून तो समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतोय व जितेंद्र आव्हाड उर्फ जितुउद्दीन हा नेमका किती बापाचा आहे याचा शोध युवा सेना घेणार आहे.युवा सेना जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड यांनी जितेंद्र आव्हाड याचा तीव्र शब्दात निषेध केला व सोलापूर मध्ये आल्यास त्याला शिवसेना स्टाईलने त्याच्या विरोधात आंदोलन उभा करू असे सांगितले. यावेळी बोलत असताना युवा सेना जिल्हाप्रमुख सागर शितोळे यांनी देखील जितेंद्र आव्हाड याचा तीव्र शब्दात निषेध करून त्याला हा हिंदू धर्म त्याला कधीच माफ करणार नाही असे सांगितले. या आंदोलनावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, युवा सेना शहर प्रमुख अर्जुन शिवशिंगवाले, अनिकेत राठोड, सुयोग पवार, प्रीतम शिंदे ,राज मिसाळ, रितेश चव्हाण ,सागर शिंदे, आदी युवा सैनिक उपस्थित होते.