सोलापूर — येथील राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयास पी पी पटेल ॲन्ड कंपनी यांच्या सौजन्याने ‘ रोटरी की डिजिटल पाठशाला ‘ अंतर्गत
ई लर्निंग संच भेट देण्यात आला. या संचामध्ये शालेय पाठ्य पुस्तकातील प्रत्येक विषयाच्या प्रत्येक पाठाचे अतिशय मार्मिक, रंजक आणि संकल्पना सहज समजतील अशा पद्धतीने चित्रीकरण केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना अभ्यासाची आणि शिकण्याची गोडी निर्माण होईल.


पी पी पटेल ॲन्ड कंपनीचे जयेश पटेल यांच्या शुभहस्ते या संचाचे उदघाटन करण्यात आले. डी. जी. क्लास च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम आणि शिकण्यासारखे खूप काही यामध्ये आहे. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम या संचात आहे. कर्णबधिर विद्यार्थ्याना याचा नक्कीच फायदा होईल आणि त्यांचे शिक्षण आनंदी आणि सुलभ होईल अशा भावना जयेशभाई पटेल यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केले तर अध्यक्षा डॉ जानवी माखिजा यांनी जयेशभाई पटेल यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
या प्रसंगी शाळेचे सचिव सुनील दावडा, राज गोपाळ झंवर, डॉ बाळासाहेब शितोळे, मेंटे संजीव, आसावरी सराफ, रेणुका पसपुले, संध्या चंदनशिवे, विजया पिताळकर, योगिता बोधले, गजानन गडगे, नागनाथ बसाटे, सोमनाथ ठाकर, सकलेन बडेखान आनंद पारेकर , चिदानंद बेनुरे, गंगाधर मदभवी, साहेब गौडा पाटील, अजित पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार, शबाना शेख, आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी केले तर सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले.