सोलापूर दि. 10(जिमाका) :- जिल्ह्यातील पशुपालक, शेतकरी, व सुशिक्षित बेरोजगारांसाठी, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सधन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर येथे 15 दिवसाचे कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन केले असून, या प्रशिक्षणाचे उद्घाटन पशुधन विकास अधिकारी डॉ. स्नेहंका बोधनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कुक्कुट पालनास चालना मिळण्यासाठी पशुधन विकास अधिकारी स्नेहंका यांनी मार्गदर्शन केले . सदर प्रशिक्षणाची तुकडी दि.10 जून 2024 ते 24 जून 2024 कालावधीत चालणार आहे. भविष्यातील शेतीपूरक जोड व्यवसायास चालना मिळण्यासाठी व त्यातून पशुपालकांचे अर्थार्जन होण्यासाठी प्रशिक्षण देणार असून यातून शेतमजूर, महिला, सुशिक्षित बेरोजगार यांना व्यवसाय सुरु करण्याची सुवर्ण संधी लाभणार आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी. एस. पी. माने, व परिचर श्री जमादार यांनी परिश्रम घेतले. तसेच पुढील तुकडीस जिल्ह्यातील पशुपालकांनी नोंदणी करून लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.