येस न्युज मराठी नेटवर्क : पुण्यातील पुजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणी भाजपानं आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री राठोडगिरी सहन करणार का? असा सवाल केला आहे. पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात विदर्भातल्या एका मंत्र्याचं कनेक्शन असल्याची चर्चा होत आहे. त्यालाच भातखळकरांनी उघडपणे नाव घेत राठोडगिरी असे म्हटले आहे.