उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 53 नगरसेवकांना सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची भूमिका मनसेच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे.भाजपाला बाहेर ठेवून शिंदेसेने सोबत जाण्याच्या या मनसेच्या राजकीय विचार प्रवाहाने उबाठा गट आणि भाजपाला हादरे बसले आहेत.या राजकीय वर्तुळातील घडामोडीवर ठाकरे गटाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत शिंदेसेनेचे 53, मनसेचे 5, उबाठा गटाचे 11, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक निवडून आला आहे.
बहुमतासाठी 62 संख्या आवश्यक असून शिंदेसेना आणि मनसे यांची मिळून 58 संख्या होते. बहुमतासाठी 62 हा आकडा गाठण्यासाठी शिंदसेना आणि मनसे 4 पावले दूर आहेत.
या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे चार नगरसेवक नॉट रिचेबल आहेत.स्थानिक पातळीवर निर्णयाची मुभा घेण्यास राज ठाकरेंनी संमती दिल्याचे स्थानिक नेते सांगत आहेत.या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी महायुतीचाच महापौर होईल असे स्पष्ट केले आहे.भाजपाने देखील हेच सांगितले आहे; मात्र मंत्री संजय शिरसाठ यांनी कल्याण – डोंबिवलीत शिंदेसेनेचाच महापौर होईल असा दावा केला आहे.या घटनेने तीळपापड झालेल्या उबाठा सेनेचे संजय राऊत यांनी स्थानिक नेत्यांच्या या निर्णयाने राज ठाकरे व्यथित झाले असून पक्ष वेठीस धरून गद्दारांशी हात मिळवणे करणाऱ्याला महाराष्ट्र माफ करणार नाही अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

