• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय शेवट करणार : उद्धव ठाकरे

by Yes News Marathi
December 17, 2022
in मुख्य बातमी
0
महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय शेवट करणार : उद्धव ठाकरे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : कर्नाटक असो वा आणखी इतर शक्ती असो, हे सगळे एकत्र महाराष्ट्रावर तुटून पडत आहेत, महाराष्ट्राचे लचके तोडत आहेत, त्यामुळे या महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकीय शेवट करणार असा निश्चय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आजचा महामोर्चा हा त्याचाच भाग असून हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे असंही ते म्हणाले.

महामोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच वर्षानंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. ज्या वेळी या मोर्चाची घोषणा केली त्यावेळी तुम्ही चालणार का असा सवाल मला करण्यात आला. त्यावेळी ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्यांच्या छाताडावर चालणार असल्याचं मी म्हणालो. मुंबईसह महाराष्ट्र झाला, पण अजूनही बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला नाही.

या मोर्चामध्ये महाराष्ट्रद्रोही नाहीत
आजच्या मोर्चामध्ये महाराष्ट्रप्रेमी सामील झाल्याचं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, आजच्या मोर्चात महाराष्ट्रद्रोही सामील झालेले नाहीत. बाळासाहेबांचे विचार घेऊन जातोय असं म्हणणारं तोतया या मोर्चामध्ये नाहीत.राज्यपाल पद मोठं आहे, त्याचा आम्ही मान ठेवतो. पण राज्यपाल कोण असावा याचा विचार करावा. राज्यपाल महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य करतात. त्यावर राज्याचे मंत्री महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतात. महात्मा फुले आणि सावित्रीबाई नसत्या तर आज या मंत्र्यासारखे वैचारिक दारिद्र आले असते.

Previous Post

अभिनेत्री माधुरी दीक्षितचे लेटेस्ट साडी फोटोशूट!

Next Post

राज्यपालांची हकालपट्टी करा; शरद पवारांचा इशारा

Next Post
राज्यपालांची हकालपट्टी करा; शरद पवारांचा इशारा

राज्यपालांची हकालपट्टी करा; शरद पवारांचा इशारा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group