• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 13, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

१७ गुन्ह्यांचा लागला शोध.. तब्बल एवढा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

by Yes News Marathi
January 11, 2022
in मुख्य बातमी
0
१७ गुन्ह्यांचा लागला शोध.. तब्बल एवढा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहर गुन्हे शाखेने गेल्या ४ महिन्यात घडलेल्या १७ गुन्ह्याचा तपास त्यात दोन आरोपीना अटक केली आहे. त्यांच्याकडून सोने-चांदी असा एकूण १० लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

५ जानेवारी रोजी पैट्रोलिंग करीत असताना, गुन्हे शाखेचे अंमलदार पोलीस नाईक विनायक बर्डे यांना बातमीदारामार्फत आरोपीची माहिती मिळाली आणि गुन्हा उघड झाला. यातील आरोपी अनंत ऊर्फ छोटा अंत्या दौलत चव्हाण (वय-३८ वर्षे, रा. मु.पो. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) व त्याच्या सोबतचा आणखी एक साथीदार किसन कुबेर काळे (वय-२२ वर्षे, धंदा – मजुरी रा. कुंभारी पारधी कॅम्प, ता. दक्षिण सोलापूर) या दोघांना ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता, ते दोघे व त्यांचे आणखी दोन साथीदार असे चौघांनी मिळुन, सोलापूर शहरात दिवसा व रात्रीच्या वेळी विजापूर नाका पोलीस ठाणे हददीत ११ ठिकाणी व एम.आय.डी.सी पोलीस ठाणे हददीत ०६ ठिकाणी अशा एकुण १७ ठिकाणी घरफोडया व जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्या दोघांना दि. ०५ जानेवारीला अटक करण्यात आली. अन्य दोन साथीदाराचा शोध सुरु आहे.

सोलापूर शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये एका विशिष्ट पध्दतीने बंद घराची कडी, कोयंडे व कूलूपे तोडून, घरफोडी चोरीचे प्रकार घडल्याने विजापूर नाका व एमआयडीसी पोलीस ठाणेस गुन्हे दाखल झाले होते. विशेषतः ऑक्टोंबर, नोंव्हेंबर व डिसेंबर-२०२१ या महिन्यात घरफोडी चोरी गुन्ह्याचे प्रमाण वाढले होते. या पाश्वभुमीवर पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी नमुद गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.

वरील आरोपींकडून ३७ तोळे सोने व १ किलो ३०० ग्रॅम चांदी असा एकुण रू.१० लाख ४८ हजार १५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील १ जबरी चोरीचा व १० घरफोडीचे गुन्हे तसेच एमआयडीसी पोलीस ठाणेकडील ६ घरफोडीचे गुन्हे असे एकुण १७ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कारवाई स.पो.नि. नंदकिशोर सोळंके व त्यांचे पथकातील पोह दिलीप नागटिळक, संतोष फुटाणे, पोना शितल शिवशरण, सचिन बाबर, विनायक बर्डे, कृष्णात कोळी, यांनी कौशल्याने वरील गुन्ह्याची उकल करून व मुद्देमाल हस्तगत करून सदरची कारवाई केली आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रिती टिपरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांळुखे यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळंके, पोह दिलीप नागटिळक, संतोष फुटाणे, पोना शितल शिवशरण, सचिन बाबर, विनायक बर्डे, कृष्णात कोळी, विजयकुमार वाळके, संदिप जावळे, यांनी केली. गुन्हे शाखेचे पोह अशोक लोखंडे, अंकुश भोसले, पोना शंकर मुळे, पोशि सुहास अर्जुन, वसीम शेख, अमोल कानडे, मपोशि निलोफर तांबोळी, रत्ना सोनवणे व चालक पोह ढेकणे, संजय काकडे, यांनी सहकार्य केले आहे.

Previous Post

आता VIVO नाही, टाटा IPL, आयपीएल संदर्भात झाला महत्त्वाचा निर्णय

Next Post

इतिहास सोलापूरच्या हुतात्म्यांचा..

Next Post
इतिहास सोलापूरच्या हुतात्म्यांचा..

इतिहास सोलापूरच्या हुतात्म्यांचा..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group